व्यंकटपुरा पेठेतील आठ दिवसात रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करणार अविनाश कदम

55
Adv

सातारा शहरातील व्यंकटपुरा पेठेतील सर्व रस्ते भुयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदण्यात आले होते सदर रस्त्यांची दुर्दशा झालीअसून वाहन चालक आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे सदर असते दुरुस्तीबाबत वेळोवेळी लेखी व तोंडी कळविण्यात आले मात्र रस्ते दुरुस्ती बाबत टाळाटाळ होत असून येत्या आठ दिवसात व्यंकटपुरा पेठेतील सर्व रस्ते दुरुस्त करण्याची मागणी माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांनी नगराध्यक्षा ना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे मागणी मान्य न झाल्यास बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे

सदर रस्त्यांची कामे 11 नोव्हेंबर पासून सुरू करत असल्याचे नगराध्यक्षांनी नगरसेवकांशी झालेल्या चर्चेदरम्यान सांगितले तसेच संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांना नगराध्यक्ष सौ माधवी कदम यांनी सुचित केले होते,

व्यंकटपुरा पेठे सह गेंडामाळ नाका जकात नाका ते कोटेश्वर मंदिर येथील रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी ही कदम यांनी केली असून। तसे न झाल्यास येत्या आठ दिवसात रास्ता रोको व बोंबाबोंब आंदोलन नाईलाजास्तव स्विकारावे लागेल पुढे होणाऱ्या परिणामांची जबाबदारी ही सातारा पालिका प्रशासनाची असेल असा इशाराही माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांनी पत्रकाद्वारे दिला आहे

Adv