केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विविध विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अमंलबजावणीचा आढावा आज येथील शासकीय विश्रामगृहात विविध विभागांच्या विभाग प्रमुखांकडून घेतला.
या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी जनधन योजना, रमाई, पंतप्रधान आवास योजना, अटल पेन्शन योजना, शिष्यवृत्ती, अण्णाभाऊ साठे यासह विविध महामंडळाकडील योजनांच्या अमंलबजावणीबाबत आढावा घेतला.