श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीत व नुकत्याच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत जोरदार प्रचार यंत्रणा राबवून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात झंझावात निर्माण केला मात्र पोटनिवडणुकीत उदयनराजेंना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे प्रचार यंत्रणा राबवत असताना कोणी फितुरी केली काय? असा प्रश्न निर्माण होत असून राजे फितुरांना ओळखा, अशी आर्त हाक उदयनराजे प्रेमीमधून दिली जात आहे.
( राजेंच्या बारीक-सारीक गोष्टीवर कोणी लक्ष ठेवून होते का ? गुप्त बैठका , इतर गोष्टी त्या कश्या बाहेर पडल्या हा प्रश्न राजे प्रेमींना पडला असून राजेंच्या दोन गटाची तर याला किनार नाही ना अशी चर्चा दिवसभर होती)
सातारा लोकसभा निवडणुकीत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आघाडीच्या माध्यमातून सातारा मतदारसंघात जोरदार प्रचार यंत्रणा राबवली. सर्वांना बरोबर घेऊन जनतेशी संपर्क साधला त्यामुळे सर्वच आघाड्यांवर अग्रेसर राहून उदयनराजेंनी सुमारे एक लाख 27 हजार मतांनी विजयश्री खेचून आणली. लोकसभा पोटनिवडणुकीत मात्र उदयनराजेंनी मोठी प्रचार यंत्रणा सुरुवातीपासून राबवली. यादरम्यान कोणी दुखावला जाऊ नये? कोणी नाराज होऊ नये? यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. भाजप व मित्र पक्षांच्या माध्यमातून जोरदार यंत्रणा राबवण्यात आली. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उदयनराजेंच्या विजयासाठी सभा घेतल्या मात्र तरीदेखील उदयनराजेंना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे नक्की माशी कुठे शिंकली? कोणी विरोधात काम केले?नक्की फितुर कोण झाले? याचा शोध उदयनराजेंनी घेण्याची गरज आहे.
काम असेल की उदयनराजे आणि निवडणुका असल्या की विरोधकांना मिळायचे असे तर कोणी करत नाही ना? याचाही शोध उदयनराजेंनी घेण्याची गरज आहे. प्रचार यंत्रणेतील कोणीतरी फितूर असण्याची शक्यता व्यक्त होत असून त्यादृष्टीने उदयनराजेंनी शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.