मुंबई : पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे सातारा जिल्हा निमंत्रक म्हणून एबीपी माझाचे राहूल तपासे यांची तर समन्वयक म्हणून पाटण येथील पत्रकार शंकर मोहिते यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी आज येथे केली.. पुढील दोन वर्षांसाठी ही नियुक्ती असेल..
राज्यात पुन्हा एकदा पत्रकारांवरील हल्ले वाढल्याने पत्रकार हल्ला विरोधी कृती समित्या भक्कम आणि सक्रीय करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे.. त्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची जिल्हावार पुनर्रचना करण्यात येत आहे.. सातारा जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची ही पुनर्रचना करण्यात येत आहे.. त्यानुसार सातारा शहर आणि सातारा ग्रामीण असे दोन पदाधिकारी नियुक्त करण्यात येत आहेत..
राहूल तपासे आणि शंकर मोहिते यांनी तालुकानिहाय समित्या स्थापन करायच्या आहेत.. प्रत्येक तालुक्यात निमंत्रक आणि समन्वयक नियुक्त करून त्याचा अहवाल केंद्रीय कार्यकारिणी कडे सादर करायचा आहे..मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे सातारा जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष हरीष पाटणे सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी ,दीपक शिंदे यांनी तपासे आणि मोहिते यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत ..