गुरुजन हेच समाजाचे खरे शिल्पकार असतात

210
Adv

शिक्षक हे समाजातील मार्गदर्शक असून समाज रचनेचा पाया ते असतात. क्षमताधिष्ठीत आणि कौशल्यधिष्ठीत समाज निर्मिती हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असतात त्या दृष्टीने गुरुजन हेच खरे समाजाचे शिल्पकार असतात असे प्रतिपादन डॉक्टर यशवंत पाटणे यांनी केले

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रपरिवार यांच्या वतीने विलासपूर येथे गुरुवंदना कार्यक्रमांतर्गत अध्यापकांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते

यावेळी कार्यक्रमास युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे, प्राचार्य जे एस पाटील ,प्राचार्य बी एस सावंत सर ,रघुनंदन मोटे ,भास्कर शिंदे, विठ्ठल जाधव, सर्वशी दिलीपराव पवार ,शिवाजीराव जगताप, अरविंद विभुते, मेजर भोसले, प्राचार्य जाधव, प्राचार्य एस एस पवार, सुरेश महाडिक, किरण नलावडे, प्राध्यापक मुरलीधर जगताप ,संदीप जाधव, व शैला अष्टेकर इत्यादी यावेळी उपस्थित होते

प्राचार्य पाटणे पुढे म्हणाले राष्ट्रसमृद्ध करण्यामध्ये ध्येयवादी शिक्षकांचा मोठा वाटा असतो संग्राम बर्गे यांनी गुरुजनांचा सन्मान करून आपली कृतज्ञता जपली आहे डॉक्टर राधाकृष्णन हे भारतीय संस्कृती थोर भाष्यकार होते शिक्षणातून काळाची आव्हाने पेलण्यासाठी आजची पिढी सक्षम आणि सुसंस्कृतपणे निर्माण व्हावी म्हणून त्यांनी मूल्य शिक्षणावर दिला शरीर व मन यांचा पवित्र मार्गाने विकास म्हणजे संस्कृती होय संस्कृतीच्या संस्कारातून सुंदरता आकारता येते आणि शिक्षक हेच खरे समाजाचे शिल्पकार असतात शिल्पकारच निकोप समाजाची निर्मिती करतो यातूनच विद्यार्थ्यांमध्ये सह सामर्थ्याची जाणीव तयार होते त्यांच्या अंगीभुत कलागुणांना आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे . सध्याचा काळ संक्रमणाचा असून भारताच्या प्रतिज्ञातील समता बंधुता ही मूल्ये जागवण्यासाठी भारताला जागल्याची भूमिका बजवावी लागणार आहे याकरता ध्येयसिद्ध समाजाची आवश्यकता आहे असे प्रतिपादन पाटणे यांनी केले

डॉक्टर पाटणे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवर गुरुजनांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या आगळ्यावेगळ्या गुरुवंदन कार्यक्रमाबद्दल विलासपूर शहरातील नागरिकांनी युवाशक्ती फाउंडेशन ला मनापासून धन्यवाद दिले

Adv