Pwd च्या कृपेने सातारकर नागरिकांना खावी लागत आहे ग्रिट

80
Adv

पीडब्ल्यूडी च्या कृपेने सातारा शहर व अन्य नागरिकांना राष्ट्रवादी भवनासमोर येणाऱ्या जाणा-या रस्त्यावरून एक प्रकारे ग्रिट खावी लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे

सातारा शहरातील पारंगे चौक ते आरटीओ ऑफिस येथे रस्त्याचे काम चालू असून या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसभरातून शेकडो जणांची आहे मात्र या कामाच्या व ठेकेदाराच्या मेहरबानी मुळे प्रचंड मानसिक त्रास होत असून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या नाका तोंडात ग्रिट जाऊन नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येते

याबाबत पीडब्ल्यूडी चे अधिकारी श्री अहिरे साहेब यांच्याशी संपर्क साधला असता तो एक कामाचाच भाग असल्याचे उत्तर दिले अहिरे साहेब असले काम सातारकरांनी पहिलेच पहिले असल्याचे दिसून येते त्यामुळे सातारकर pwd च्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत सदर रस्त्याचे काम झाले होते मात्र सीलकोट बाकी होता सीलकोट वरून नागरिक घसरू नयेत म्हणून ग्रिट टाकले असल्याचेही श्री अहिरे यांनी सांगितले

Adv