पिंपोडे बुद्रुक : (प्रतिनिधी) जाधववाडी ता.कोरेगाव
येथील परसप्पा विठ्ठल बगले (सर) यांना सिएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या वतीने दिव्यांग योद्धा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.श्री बगले सर स्वतः इतर अपंग बांधवांच्या काही समस्या असल्यास त्याचे निवारण करण्यासाठी कायम धडाडीने अग्रेसर असतात.
अपंग बांधवांना शासकीय सुविधा मिळवण्यासाठी, पिवळे रेशन कार्ड अथवा अंतोदय रेशन कार्ड मिळवणे करिता, कोणास घरकुल पाहिजे असल्यास, तसेच व्यवसाय करण्यासाठी कर्जकामी, मोफत एसटी प्रवास, तीन चाकी सायकल, मोटरसायकल,अशा अनेक अपंग बांधवांसाठी असणाऱ्या सुविधा मिळवण्यासाठी कायम धडाडीने पुढाकार घेऊन या सर्व गोष्टीची पूर्तता करतात. वेळ पडल्यास शासनदरबारी सर्व अपंग बांधवांना घेऊन मोर्चा, आंदोलने करून प्रशासनाला जेरीस आणतात, त्यातूनच आपल्या अपंग बांधवांची रखडलेली कामे पाठपुरावा करून मार्गी लावतात, सातारा जिल्ह्यातील प्रहार अपंग क्रांती संघटना वाढीसाठी त्यांचे मोलाचे कार्य आहे.असा हा धडाडीचा कार्यकर्ता असल्यामुळे माननीय मंत्री महोदय बच्चुभाऊ कडू साहेबांनी त्यांची दखल घेऊन त्यांना प्रहार अपंग क्रांती सातारा जिल्हा कार्याध्यक्ष पद बहाल केले
. व त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती दिली, त्याच प्रकारे सिएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनेलनेही त्यांच्या कामाची दखल घेत श्री.परसप्पा बगले सर यांना अपंग योद्धा पुरस्कार देऊन सन्मान केला. त्यांना अपंग योद्धा पुरस्कार मिळाल्यामुळे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे तसेच विविध संघटनांनी सुद्धा त्यांचे अभिनंदन केले.