सातारा पालिकेचा नामांकित असा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यासह पत्रकार व शिक्षक पुरस्कार यंदाच्या वर्षी देणार असल्याची घोषणा उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी केली
गेल्यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर पुरस्कार ,पत्रकार व शिक्षक पुरस्कार हे रखडले होते ते आता यंदाच्या वर्षी देणार असल्याची घोषणा सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी आज म्हणजेच पत्रकार दिनी केली डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सह रखडलेले अन्य पुरस्कार यांच्या संदर्भात लवकरच जी कमिटी स्थापन झालेली आहे त्यांच्याबरोबर मीटिंग आयोजित करून डॉक्टर नरेंद्र दाभोळकर या पुरस्काराला शोभेल अशा नावावर चर्चा होऊन सर्वानुमते मंजूर करणार असल्याचेही उपाध्यक्ष शेंडे यांनी यावेळी सांगितले
उपनगराध्यक्ष यांच्या निर्णयाचे स्वागत –विनोद कुलकर्णी
सातारा पालिकेचा रखडलेला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर पुरस्कार पत्रकार व शिक्षक पुरस्कार यंदाच्या वर्षी घेणार असल्याचे समजते या निर्णयाबद्दल उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांचे प्रथमता स्वागत करतो गेल्या तीन वर्षा पासून रखडलेले डॉक्टर नरेंद्र दाभोळकर पुरस्कारासह सर्व पुरस्कार पालिकेने द्यावेत अशी मागणीही विनोद कुलकर्णी यांनी केली आहे