मा . सहा . पोलीस अधीक्षक श्री . समीर शेख व मा . वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . मुगुट पाटील यांनी गन्हे प्रकटीकरण शाखेस अवैध धंदयावर कारवाई करुन समुळ उच्चाटन करणे बाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले होते . त्याप्रमाणे काल दि . २५ / ११ / २०१९ रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना मा . वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . मुगुट पाटील यांना त्यांचे गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , राधिका सिग्नल ते भूविका बँक चौक दरम्यान एक इसम त्याचे सिल्व्हर रंगाचे इ झेन कारमधुन देशी दारुची चोरटी वाहतुक करणार आहे .
त्याप्रमाणे त्यांनी गुन्हे प्रकटीकण शाख्नेच्या कर्मचाऱ्यांना बोलावुन घेवुन सदर ठिकाणी जावुन सापळा लावुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या . त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी हे एस . टी . स्टँड ते भुविकास बँक परिसरात सापळा लावुन थांबाले असता २१ . ५० वा . चे सुमारास मिळाले बातमीतील कार क्र . एमएच – ०१ – एएन – २६२४ ही भुविका बँक बाजुकडे येताना दिसली त्यास स्टाफने थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु चालकाने कार तशीच पुढे चालवित घेवुन जावु लागला म्हणुन सदरचा कारचा पाठलाग करुन त्यास नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात अडवुन चालक नामे अक्षय सुरेश शिवगण वय – २४ वर्षे रा . ९६ , रविवार पेठ , सातारा यास ताब्यात घेवुन त्यांचेकडुन ३१ , ६८० / – रुपये किंमतीचे देशी दारुचे १२ बॉक्स व ३० , ००० / – रुपये किंमतीची कार असा एकुण ६१ , ६८० / – रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन त्याचेवर शाहुपूरी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र प्रोव्ही कायदा कलम ६५ ( ई ) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नाईक सोमनाथ भोसले हे कीरत आहेत
. सदरची कारवाई मा . सहा . पोलीस अधीक्षक श्री . समीर शेख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . मुगुट पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि . श्री . विशाल वायकर पोलीस हवालदार हिम्मत दबडे – पाटील , हसन तडवी , पो . ना . लैलेश फडतरे , सचिन माने , अमित माने पोकॉ स्वप्निल कुंभार , ओंकार यादव , मोहन पवार , पंकज मोहिते व होमगार्ड खरात यांनी केली आहे .