पोलीस मैदानाला शहीद अशोक कामटे यांचे नाव देण्याची मागणी

313
Adv

पोलीस अधीक्षक म्हणून शहीद अशोक कामटे यांनी सातारा येथे उल्लेखनीय कामगिरी केली होती जे सातारकर च्या स्मरणात कायम आहे पोलिस कवायत मैदान याची डागडुजी व त्याचा विकास करण्यासाठी कामटे साहेबांनी विशेष प्रयत्न केले होते म्हणून त्या मैदानास शहीद अशोक कामटे असे नाव देण्यात यावे अशी मागणी गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे केली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते पद्माकर सोळवंडे यांनी सांगितले

शहीद अशोक कामटे यांचे सातार्‍यातील कार्य आणि 26 11 च्या भायड हल्ल्याबाबत सातारकर नागरिकांच्या भावना संदर्भानुसार वेळोवेळी कथन केलेले आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि खाकीतील माणसाला प्रेरणा देणारी ही ज्वलंत मागणी विनाविलंब अमलात राज्याचे गृहराज्यमंत्री म्हणून आपण तातडीने अमलात आणावी अशी अपेक्षाही सोळवंडे यांनी व्यक्त केली

Adv