सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवारी श्री.छ. उदयनराजे भोसले व पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा गुरुवार दि. १७ रोजी साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर होणार आहे. या सभेची जय्यत तयारी
भाजपच्यावतीने करण्यात येत असून सभामंडपाचे भूमीपूजन विजयादशमीच्या मुहुर्तावर मंगळवारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साताऱ्यात प्रथमच जाहीर सभा होत असून शतप्रतिशत भाजप या घोषणेनुसार सध्याच्या विधानसभा आणि लोकसभेच्या
पोटनिवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्र भाजपमय करण्याच्या दृष्टीने या सभेस विशेष महत्व आहे. छत्रपती शिवरायांचे थेट १३ वे वंशज असलेल्या श्री. छ. उदयनराजे
भोसलेंसह विधानसभेचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदनदादा भोसले, डॉ. अतुल भोसले, जयकुमार गोरे, शंभूराज देसाई, धैर्यशिल कदम, महेश शिंदे, दिगंबर
आगवणे या जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसह पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांच्या प्रचारार्थ होत असलेल्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सैनिक स्कूलच्या मैदानावर सभा मंडपाच्या उभारणीच्या भूमीपूजन प्रसंगी श्री. छ. उदयनराजे भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, नगराध्यक्षा सौ.
माधवी कदम, केतन भोसले, भरत पाटील, दत्ताजी थोरात, सुनील काटकर, नरेंद्र पाटील, संदीपभाऊ शिंदे, प्रविण धस्के, विजय काळे, सुवर्णा पाटील, नगरसेवक
धनंजय जांभळे, यांच्यासह भाजपा, शिवसेना व मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.