पिंपोडे बु ॥ येथील 22 मार्च रविवारी होणारा आठवडी बाजार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद करण्यात आलेला आहे. कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असून महाराष्ट्रात सुद्धा करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत याच धर्तीवर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसे आदेश प्रत्येक ग्रामपंचायतीला देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गजन्य रोगामुळे उत्तर कोरेगाव मधील महत्त्वाची असणारी तसेच पंचक्रोशीत खेडोपाड्यात केंद्रस्थानी असणारी पिंपोडे बु ॥ येथील आठवडा बाजार बंद ठेवण्यात येणार आहे . तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात पुणे व मुंबई येथे झालेला असून ग्रामीण भागातील चाकरमानी कामधंद्यासाठी पुणे तसेच मुंबई येथे गेलेले आहेत परंतु कोरनामुळे मुंबई व पुणे स्थित चाकरमानी गावाकडे येऊ लागला आहे.
खबरदारी म्हणून महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील आठवडा बाजार बंद ठेवावा असा आदेश काढला आहे. पिंपोडे बु ॥ येथील आठवडा बाजारात पंचक्रोशीतील लोक भाजीपाला तसेच इतर साहीत्य खरेदीसाठी येत असतात बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. कोरोना विषाणूचा पादुर्भाव होऊ नये याची दक्षता पिंपोडे बु ॥ ग्रामपंचायतीने सुद्धा घेतली आहे तरी परिसरातील शेतकरी तसेच खरेदीदार यांनी पिंपोडे येथील रविवारी होणारा आठवडी बाजार बंद आहे,तसेच पिंपोड येथील संपूर्ण बाजार पेठ ता 20मार्च ते 23मार्च,४ दिवस या कालावधीत,बाजारपेठे तील सर्व व्यवहार बंद राहतील असे ग्रामपंचायतीतर्फे आव्हान करण्यात आले आहे.