माण देशी केराबाई खांडेकर यांचे दुख:त निधन.

183
Adv

म्हसवड येथील माण देशी फौंडेशनच्या माध्यमाने देशात व विदेशातही अल्पावधीत प्रसिध्दी झोतात आलेल्या म्हसवड येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील केराबाई दादा खांडेकर‌ यांचे दुख:द निधन झाले.

म्हसवड येथील माण देशी फौंडेशन मार्फत सातारा,व मुंबई येथे प्रत्येक वर्षी आयोजित केल्या जात असलेल्या ‘माण देशी महोत्सव’कार्यक्रमाच्या प्रवेशद्वार व कार्यक्रमातही ग्रामीण भागातील नऊवारी साडी व नाकात नथ असा पोषाख परिधान केलेल्या‌ व मोबाईल कानावर लावून बोलतानाचे मोठ-मोठे डिजीटल बॅनर्स सातारकर व मुंबई करांचे चटकण लक्ष वेधून घेत होत्या त्त्या‌ याच केराबाई खांडेकर होत्या.

माण देशी महोत्सव बरोबरच माण देशी फौंडेशनच्या म्हसवड येथील मुख्य कार्यालयासह महाराष्ट्रातील मुंबई,नाशिक,पुणे,चिपळून, लातूर,सातारा,वडूज, दहिवडी,गोंदवले,यासह कर्नाटक,गुजरात,आसाम राज्यातीलही प्रत्येक शाखेत केराबाई खांडेकर यांचीच डिजिटल बोर्ड व बॅनर झळकलेले आहेत.

विशेष‌ म्हणजे केराबाई खांडेकर या मोबाईलवर बोलत असलेले छायाचित्र फ्रांस‌ मधील नामांकित‌ छाया चित्रकार सिरिल यांनी‌ त्यांच्या कॅमे-यातून अचूकपणे टिपले होते.‌

देश विदेशातही टीव्ही चॅनेलसह विविध भाषेतील वृतपत्रे व मासिकातही केराबाई यांच्या या छायाचित्रांस स्थान दिले गेले आहे.

माण देशी बँक व माण देशी फौंडेशनच्या अध्यक्ष‌ा श्रीमती चेतना सिन्हा यांचेसह माण देशी परिवार वतीने त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.

Adv