पवार साहेबांना भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आ जयकुमार गोरे

231
Adv

मी माझ्या खाजगी कामासाठी गेलो होतो मोदी बागेत पवार साहेब राहतात हे मला अजिबात माहिती नाही मी माझ्या कुटुंबीयांसमवेत आहे त्यामुळे मी पवार साहेबांना भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे स्पष्टीकरण भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिले

मी भारतीय जनता पक्ष सोबतच आहे माझा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे आत्ताच्या घडीला मला वाटत नाही की मी कुठल्या दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला भेटावे राजकारणात काहीही होऊ शकतं त्यामुळे भाजपचे सरकार होणार नाही असे वाटण्याचे बी कारण नसल्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे झोल देणारे नेते आहेत कोण कोणाच्या संपर्कात आहे हे पाहण्यासाठी खूप कमी कालावधी राहिला आहे तेव्हा तुम्हाला समजेल कोण कोणासोबत आहे असा इशाराही आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी दिला

Adv