सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी माजी पाणीपुरवठा सभापती यांना आदेश दिले होते की पाणीपुरवठा विभागातील मुंगळा पाणी पुरवठा विभागात नको त्यानंतर त्याची उचलबांगडी झाली होती मात्र पुन्हा विद्यमान पाणीपुरवठा सभापती यांनी त्या मुंगळ्याला पाणीपुरवठा विभागात आणल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला
तत्कालीन माजी सभापती यांनी पाणीपुरवठा विभागातील मुंगळयाची तक्रार थेट पुण्यात जाऊन आघाडीचे नेते यांच्याकडे केली होती तत्कालीन सभापती हे चांगले काम करत होते मात्र हा मुंगळा त्यांना कुठलाही प्रतिसाद देत नव्हता
तसा पाणीपुरवठा विभाग हा अत्यंत नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय त्या कामातच या मुंगळ्याने दिरंगाई केली त्यामुळे संबंधित सभापती व मुंगळयाची तू तू मै मै रोज होत होती ऐवढ्या तक्रारी झाल्याने सत्ताधारी आघाडीचे नेते यांनी त्या मुंगळ्याची बदली करा असे आदेश तत्कालीन सभापती यांना दिले होते त्या मुंगळ्याची उचलबांगडी झाली होती सभापतींचा बदल झाल्यानंतर तो मुंगळा पुन्हा पाणी पुरवठा विभागात येऊन चिकटला नंतर तो पाणी कमी आणि तरररर पणे वावरू लागल्याने यावर कोणाचाच अंकुश राहिला नसल्याचे दिसून येते
क्रमश