पाणीपुरवठ्याच्या मुंगळ्याचे अतिक्रमण सातारा पालिका काढणार का ?

65
Adv

सातारा पालिकेतील पाणीपुरवठा विभागातील मुंगळ्याने स्वतःच्या घराच्या दारात अतिक्रमण केले असून ते अतिक्रमण सातारा पालिका काढणार का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे

सर्वसामान्यांचे अतिक्रमण असले की सातारा पालिका तत्परतेने अतिक्रमण काढते मात्र दस्तुरखुद्द सातारा पालिकेतील पाणीपुरवठा विभागातील मुंगळ्यांने स्वतःच्या घराच्या दारात अतिक्रमण करून स्वच्छ सुंदर अशी झाडे लावून ते अतिक्रमण नाहीच असे चित्र निर्माण केले आहे यासंबंधी नगराध्यक्ष माधवी कदम माजी मुख्याधिकारी शंकर गोरे नगरसेवक अमोल मोहिते नगरसेविका आशा पंडित यांना निनामी पत्राद्वारे काही जागरूक नागरिकांनी कळवले होते मात्र यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याने संबंधित पदाधिकाऱ्यांच्या वर शंका उपस्थित झाली आहे

आपलं ते पोरगं दुसऱ्याचं ते कार्ट असाच दुजाभाव सध्या सातारा पालिकेत चालत असल्याचे दिसून येते लक्ष्मीदर्शना पुढे कोणाचेही हितसंबंध नातेसंबंध चालत नाहीत याचे उत्तम उदाहरण म्हणजे सातारा नगरपालिका च म्हणावे लागेल नाहीतर या मुंगळ्याची इथपर्यंत मजल गेलीच नसती

क्रमशः

Adv