छत्रपतींच्या राजधानीत पाण्याचा टँकर न देणाऱ्या पदाधिकाऱ्याचा नागरिकांनी केला निषेध

39
Adv

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सातारा शहरात सत्ता असलेल्या पालिकेत अशा घटना होत असतील तर हे दुर्दैवच म्हणावे लागेल सातारानामाकडे नागरिकांनी हितचिंतकानी संबंधित पदाधिकारी कोण याची विचारणा केली व संबंधित पदाधिकाऱ्यांचा निषेध केला राजकारणाची शोभा टिकवायची कि घालवायची हे ज्याच्या त्याच्या हातात असते

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची सत्ता असलेल्या पालिकेत त्यांच्याच पदाधिकारी याकडून अशया घटना होत असतील तर दुर्दैवाच म्हणावे लागेल मी सांगितलं तरच त्या कुटुंबाला टँकर द्यायचा कुणाला विचारून टॅंकर दिला असा वाहतूक विभागाच्या प्रमुखांना दमच एक प्रकारे दिला गेला वाहतूक विभागाच्या प्रमुखांनी जबाबदार नागरिकास टँकर देण्यास टाळाटाळ केली तुम्ही संबंधित पदाधिकाऱ्यांना फोन करा तरच टॅंकर मिळेल अशी भूमिका वाहतूक विभागाच्या प्रमुखांनी जबाबदार नागरिकाला सांगितली

त्या कुटुंबाचाही विचार करा त्याच्या घरात पाणी नाही भर उन्हाळ्यात अशी अवस्था पालिकेकडून होत असेल तर अपेक्षा कोणाकडून करायची

पाण्याचे राजकारण करून कोणी लोकप्रिय होत नाही पुलाखालून काय गेलं आणि काय नाही गेलं त्याची कुंडली सातारा नामाकडे आहेच स्वतःच्या घरात पाणी आले तरी चालेल पण दुसऱ्याच्या घरात पण मला पाणी विचारूनच गेले पाहिजे अशी भूमिका या पदाधिकाऱ्यांची दिसते टँकर न देणारा पदाधिकारी छत्रपतीच्या भूमीतील पहिलाच असा हा स्वयंघोषित लोकप्रिय पदाधिकारी कधी सातारकरांनी बघितला नसेल

Adv