स्वच्छ भारत अभियान नागरी 2023 साठी पांचगणी नगरपरिषदेस पश्चिम विभागात प्रथम क्रमांक

243
Adv

स्वच्छ भारत अभियान नागरी 2023 साठी पांचगणी नगरपरिषदेस पश्चिम विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.गुरुवार दिनांक 11/01/ 2024 रोजी केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय यांच्या वतीने दिल्ली येथील भारत मंडपम या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे.

यासाठी पांचगणी गिरीस्थान नगरपरिषदेस निमंत्रित करण्यात आले आहे.गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय यांच्यावतीने दरवर्षी स्वच्छता अभियान राबवले जाते,या अभियानांतर्गत केंद्र सरकारने नियुक्त केलेले पथक वेगवेगळ्या निकषानुसार सर्वेक्षण करते व देशपातळीवर आणि राज्यपातळीवर विभागनिहाय क्रमांक दिले जातात.स्वच्छ सर्वेक्षण 2023 साठी पांचगणी गिरीस्थान नगरपरिषदेस पश्चिम विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून या निमित्ताने नगरपरिषदेचे कार्यक्षम प्रशासक तथा मुख्याधिकारी माननीय निखिल जाधव यांनी या कामगिरीबद्दल पांचगणी शहरातील नागरिकांचे तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आणि सर्व पालिका कर्मचारी यांचे विशेष आभार मानले.

Adv