Saturday, October 24, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City माजी नगरसेवक विलास आंबेकरांसह मुलगी, सुनेवर होणार फौजदारी

माजी नगरसेवक विलास आंबेकरांसह मुलगी, सुनेवर होणार फौजदारी

384
Adv

येथील माजी नगरसेवक विलास आंबेकर, मुलगी ऋतुजा विलास आंबेकर, सून सौ. प्रियांका रोहन आंबेकर यांनी ठोसेघर (ता. जि.सातारा) येथील जमीन तापोळा (ता.महाबळेश्वर) अस्तित्वात नसलेला जमिनीचा खोटा शेतकरी दाखला करुन जमीन खरेदी केली. खोटी कागदपत्रांव्दारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी खटला दाखला करावा याबाबत मागणी केली होती. त्यानुसार सातारा तहसीलदारांनी विलास आंबेकर, मुलगी ऋतुजा आंबेकर, सून सौ. प्रियांका आंबेकर यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश सहाय्यक दुय्यम निंबधकांना दिले असून जमीन शासन जमा करण्याचे आदेश दिल्याचा गौप्यस्फोट सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषेदत दिली. तसेच श्री. आंबेकर यांचे अनेक कारनामे असून त्याचाही लवकरच भांडाफोड करणार असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.
यावेळी बोलताना श्री. मोरे म्हणाले, आंबेकर कुटुंबियांनी ठोसेघर (ता.जि.सातारा) येथील भागुबाई श्रीपती बेडेकर, कोंडीबा श्रीपती बडेकर यांच्या जमीन पैकी २४.७८ आर मिळकत ही २१ जून २०२३ रोजी चौघांनी खरेदी केली आहे. त्यापैकी ऋतुजा विलास आंबेकर, सौ. प्रियांका रोहन आंबेकर यांनी ही शेतजमिन खरेदी करण्यासाठी विलास वसंतराव आंबेकर (रा. ५१२ सदरबझार, अयोध्या अपार्टमेंट) यांचा तापोळा (ता. महाबळेश्वर जि. सातारा) येथील गट नं. २० हिस्सा क्र. २०/१ चा ७/१२ उतारा जोडला. त्यावर विलास आंबेकर यांनी रिता योगेश शर्मा यांच्याकडून गट नं. २०/१ ही शेत जमीन खरेदी केल्याची नोंद आहे. परंतु धक्कादायक बाब म्हणजे या जमिनीबाबत माहिती अधिकारात माहिती घेतला असता गट क्र. २० हिस्सा क्र. २०/१ हा अस्तित्वातच नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच गट नं. २०/१ चे – ७/१२ उता-यावर फेरफार क्र. १२२ च्या आधारे विलास वसंतराव आंबेकर यांची मिळकतधारक म्हणून नोंद झालेली. त्याची माहिती घेतली असता हा फेरफार हा १ मार्च १९८२ रोजीचा असून त्यावर विठू हरी सुतार, गेनू हरि सुतार यांनी रामू लक्ष्मण धनावडे यांच्याकडून ही मिळकत खरेदी केल्याची नोंद आहे. ठोसेघर सातारा येथील गट क्र. १९६ पैकी खरेदी केलेली शेतजमिन त्याची नोंद फेरफार क्र १२९८ अन्वये गट नं. १९६ ला ऋतूजा विलास आंबेकर, सौ. प्रियांका रोहन आंबेकर यांची नोंद झालेली आहे. विशेष म्हणजे ऋतुजा आंबेकर ही विलास आंबेकर यांची मुलगी आहे तर सौ. प्रियांका रोहन आंबेकर या विलास वसंतराव आंबेकर यांची सून आहे.विलास वसंतराव आंबेकर यांनी तापोळा (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथील मिळकत अस्तित्वात नसताना तसेच ते शेतकरी नसताना याची पूर्ण जाणीव त्यांना असून देखील शासनाची फसवणूक करून त्याच प्रमाणे खरेदी देणार यांनाही आपण शेतकरी असल्याचे लाबाडीने दर्शविण्यासाठी खोटा ७/१२ उतारा स्वत:च तयार केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत सातारा तहसीलदारांकडे तक्रार केल्यानंतर त्याचा तपास परळी मंडलाधिकाऱ्यांनी करुन त्यांनी त्याचा अहवाल तहसीदारांना दिला असून त्यात वरील बाबींचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे सातारा तहसीलदारांनी वरील तिघांवर फौजदार कारवाई करण्याते आदेश तसेच ठोसेघर (ता. सातारा) येथील ऋतुजा आंबेकर, सौ. प्रियांका आंबेकर यांच्या हिश्श्याची जमीन जमा करण्याचे आदेश दिल्याची माहिती श्री. मोरे यांनी दिली.

चौकट
नटवरलालचे कारनामे
माजी नगरसेवक विलास आंबेकर यांचे अनेक कारनामे दुसऱ्याला ब्लॅकमेलर म्हणणारे स्वत:च ब्लॅक निघाले असल्याचे स्पष्ट झाले आहेत. खोटा दाखला, विविध ठिकाणी केलेली अनधिकृत बांधकामे, पतसंस्थेत केला आर्थिक घोटाळा, कुबेर विनायक मंदिरामधील आर्थिकबाबातीत दोषी असे त्यांचे नटवरलाल सारखे कारनामे असून या सर्व काळ्या कृत्याचा लवकरच भांडाफोड करणार आहे. प्रत्येकवेळेस हे महाशय अनेक बेकायदेशीर गोष्टीत अडकले परंतु प्रत्येकवेळी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर कृत्ये करुन यांना वाचवले परंतु आता यापुढे ते वाचणार नाहीत असेही श्री. मोरे यांनी स्पष्ट केले.

Adv