Saturday, September 5, 2026
spot_img
Home Satara District Panchgani मुख्याधिकारी जाधव यांच्या नियुक्तीने पाचगणीकर समाधानी

मुख्याधिकारी जाधव यांच्या नियुक्तीने पाचगणीकर समाधानी

343
Adv

पाचगणी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी निखिल जाधव यांची पुन्हा नियुक्ती झाल्याने पाचगणी येथील नागरिक राज्य सरकारच्या निर्णयावर समाधानी असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे

मुख्याधिकारी निखिल जाधव यांची काही महिन्यांपूर्वी चंद्रपूर येथील राजुरा नगरपरिषद येथे मुख्याधिकारी म्हणून बदली झाली होती मात्र राज्य सरकारच्यावतीने निखिल जाधव यांना पाचगणी नगरपरिषदेचा अतिरिक्त कारभार दिला असून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त पदाचाही कारभार दिला आहे मात्र निखिल जाधव यांच्या कामगिरीवर पाचगणी येथील सर्वसामान्य नागरिक खुश असल्याने आपले प्रश्न सोडवण्यासाठी व आपल्या व्यथा ऐकून घेणारा आपला हक्काचा माणूस मुख्याधिकारी श्री जाधव असल्याची भावना पाचगणीकरांमध्ये दिसून येते

स्वच्छ सर्वेक्षण असो माझी वसुंधरा असो या योजनेमध्ये मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी उत्कृष्ट कामगिरी केली त्यामुळे राज्य सरकारचा पुरस्कार मिळवून उत्कृष्ट निधीही मिळवला त्यामुळे सर्वसामान्य पाचगणीकर राज्य सरकारने फेरनियुक्ती केलेल्या मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या नियुक्तीवर समाधी असल्याचे चित्र सध्या पाचगणीत पाहायला मिळते

Adv