Monday, May 25, 2026
spot_img
Home Satara District Panchgani सहा महिन्यातच पाचगणी येथील सोलर ट्री ची झाली पालखी…

सहा महिन्यातच पाचगणी येथील सोलर ट्री ची झाली पालखी…

296
Adv

( अजित जगताप)
पाचगणी दि: थंड हवेचे ठिकाण असलेल्या सातारा जिल्ह्यातील पाचगणी नगरपरिषदेने अनेक पुरस्कार प्राप्त करून घेतले आहेत. परंतु, काल वादळी वारा व पावसाने सिडने पॉईंट येथील सोलर पॅनल ट्री ची अक्षरशा कोसळून पडल्याने पालखी झाली. आता याची जबाबदारी नेमकी कोणाची? याचा आता शोध सुरू झालेला आहे.
थंड हवेचे ठिकाण असलेल्या पर्यावरणदृष्ट्या अति संवेदनशील क्षेत्र म्हणून पाचगणी कडे पाहिले जाते. महाबळेश्वर- पाचगणी या ठिकाणी लाखो पर्यटक पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे राज्यातील मंत्री, वरिष्ठ अधिकारी, नगर विकास खात्यामार्फत तसेच पर्यटन विभाग विशेष निधी देऊन या परिसराची निगा राखण्यासाठी झटत असतात. सध्या केलेल्या कामाची गुणवत्ता राखली गेली नसल्याने सब घोडे बारा टक्के…ही टक्केवारी आता पर्यटनावर व पाचगणीच्या निसर्गावर घाला घालत आहे. येथील तीन उद्यानाची अवस्था बिकट झाली असून ७५२० देशी व प्रजातीच्या वृक्ष लागवडीची लागवड झाली असली तरी यातील रोपे किती जिवंत राहिले आहेत? याची माहिती पाचगणी नगर परिषदेकडे नाही.
सहा महिन्यापूर्वी सिडने पॉइंट व टेबल लँड या दोन्ही ठिकाणी सोलर ट्री बसवण्यात आले. रात्रीच्या वेळेला गोल्डन कलर मध्ये चमकणाऱ्या या सोलर ट्री मुळे पर्यटक आकर्षित झाले होते.
काल पाचगणी व परिसरात पाऊस आणि वाऱ्यामुळे फारशी पर्यटकांची गर्दी नसतानाच सोलर ट्रीची पालखी झाली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही . पाचगणी नगरपरिषद निधीचा मात्र चांगलाच प्रकाश पडला आहे. मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे ठरवले आहे. आता चौकशी अहवाल व कारवाई कधी होणार? याची प्रत्यक्ष पाचगणीकरांना आहे. सध्या विजेची बचत करण्यासाठी सौर ऊर्जा बसवण्यात आलेल्या नगरपरिषद इमारत, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, ऊर्जा प्रकल्प याची यानिमित्त तपासणी करावी. अशी मागणी पुढे आलेले आहे.

………………………………
फोटो– पाचगणी येथील सोलर ट्री व पाऊस वाऱ्यात त्याची ची अशी अवस्था झाली… (छाया– अजित जगताप पाचगणी)

Adv