Wednesday, April 22, 2026
spot_img
Home Satara District Panchgani ३९ गाळेधारकांना पाचगणी नगरपालिकेच्या नोटीसा

३९ गाळेधारकांना पाचगणी नगरपालिकेच्या नोटीसा

464
Adv

पांचगणी शहरातील शॉपिंग सेंटर मधील व्यावसायिकांनी पालिकेच्या मंजूर गाळ्या व्यतिरिक्त केलेले बांधकाम, पत्राशेड सात दिवसाचे आत काढून घ्यावीत असे नोटीस पालिकेने ३९ गाळा धारकांना बजावल्याने या गाळाधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिलेल्या नोटिसात पालिकेच्या मालकीच्या शॉपिंग सेंटरमध्ये गाळा मंजूर असून त्याचे क्षेत्रफळ मोजून हा गाळा पालिकेने या गाळा धारकांना त्यांच्या ताब्यात देताना ज्या स्थितीत होता तसाच ठेवणे त्यांच्यावर बंधनकारक आहे. देऊ केलेल्या गाळ्याच्या चतुःसीमा मध्ये बदल करणे किंवा पोट भाडेकरू ठेऊन उत्पन्न कमावणे अभिप्रेत नाही. या गाळ्यामध्ये नगरपरिषदेच्या पूर्व परवानगी शिवाय कोणत्याही स्वरूपाचे अंतर्गत बदल किंवा गाळ्याशी संलग्न पुढच्या अथवा मागच्या बाजूस तसेच गाळ्याच्या दर्शनी भागात पत्रा शेड उभारणे बेकायदेशीर असून ते केले असल्यास संबंधितांनी स्वतःहून ७ दिवसांचे आत काढून घ्यावे, अन्यथा विहित मुदत संपल्यावर नगरपरिषद काढून घेईल.

नगरपरिषदेची पूर्व परवानगी न घेता जे काही अंतर्गत बदल केले असतील ते ही पूर्ववत करावेत अन्यथा नगरपरिषद ते पूर्ववत करेल व संबंधित खर्चाची वसुली गाळे धारकाकडून करेल. मुख्याधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली असता बांधकाम रचनेत बदल किंवा पोट भाडेकरू ठेवल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ व इतर संबंधित प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Adv