पालिकेच्या लेखा विभागाला विवेकी बुद्धीची गरज असल्याचे चित्र सध्या दिसून येते दिवाळी तोंडावर असताना अजून ठेकेदारांच्या हातात एकही रुपया जमा झाला नसून ढिसाळ नियोजन काम लेखा विभागाचे असल्याचे दिसून येते
दिवाळी सण हा दारात येऊन उभा असताना सातारा पालिकेच्या ठेकेदारांच्या हातात अजून एक रुपयाही मिळाला नाही आपल्या पाटीलकि च्या जोरावर हिम्मत दाखवून आपण किती हुशार आहोत असा भासवणारा एक लेखा विभागातील अधिकारी ठेकेदारांना कसे गुंडाळायचे काम करतो त्याचे उत्तम उदाहरण हे सातारा पालिकेतल्या लेखा विभागातच पहायला मिळते ठेकेदारांनी दिवाळी कशी साजरी करायची अशा प्रश्न पालिकेच्या ठेकेदारांना आता पडला आहे आपले बिल आज होईल उद्या होईल या आशेवर ठेकेदार रोज लेखा विभागाची पायरी झिजवताना दिसत आहेत याची चिंता लेखा विभागाला नाही त्यामुळे लेखा विभागाला विवेकी बुद्धीची गरज असल्याचे दिसून येते
मुख्याधिकारी लक्ष देणार का
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी म्हणून सातारकर हे अभिजित बापट यांच्या कडे पाहतात त्यांनी या प्रकरणी लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी चर्चा ठेकेदारांकडून पालिकेत आज दबक्या आवाजात सुरू होती गेल्या ६ महिन्यांपूर्वी अगोदरच पालिकेतील लक्ष्मी दर्शनाने पालिकेची अब्रू तर गेलीच आहे याचा राग मनात धरून लेखा विभागातील हिंममतीने काही ठेकेदाराची पिळवणूक सुरू केली आहे
लेखा विभागातून फायली घाळ होण्याचे सत्र हे चालूच असते शेवटच्या टप्प्यात ठेकेदाराचे बिल लेखा विभागाकडे आले की त्याची पूर्ण फाइल गायब होते या गायब होणाऱ्या फाइल च्या हिम्मतीला कोणाचाही अंकुश नसल्याचे दिसते
माजी लेखापाल विवेक जाधव हे पालिकेच्या लेखापाल पदी असताना दिवाळीच्या 15 दिवस अगोदर ठेकेदारांचे पैसे हे आदा होत होते लेखा विभागात आता त्याउलट चित्र निर्माण झाले आहे लक्ष्मी दर्शनासाठी काहीही करण्याची तयारी या विभागातील काही बाहादुर हिमतीने करताना दिसतात त्यामुळेच ठेकेदारांची पिळवणूक कशी करावी हे शिकण्यासारखे या विभागात मिळते