जनता सहकारी बँक लि. साताराचे सभासद किशोर महादेव ननवरे (रा. गोडोली) यांना फोर्से ट्रॅक्स क्रुझर अॅम्ब्युलन्स गाडीचे वितरण बँकेच्या पोवई नाका शाखेतर्फे भागधारक पॅनेलचे प्रमुख विनोद कुलकर्णी आणि चेअरमन अतुल जाधव यांच्याहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक करण्यात आले. यावेळी बँकेच्यावतीने अत्यल्प व्याजदराच्या वाहन तारण योजनेचा ग्राहकांनी फायदा घ्यावा. बँकेतर्फे खास दसरा व दिवाळीनिमित्त अल्प व्याजदराने वैयक्तिक व व्यावसायिक वाहन कर्ज वितरण सुरु आहे, अशी माहिती विनोद कुलकर्णी यांनी यावेळी दिली.
श्री. कुलकर्णी पुढे म्हणाले, बँकेच्या पोवई शाखेचे कामकाज प्रगतीपथावर असून ते कौतुकास्पद आहे. ही बँक सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी कटिबध्द आहे. या आर्थिक वर्षात बँकेच्या 16 शाखांच्या माध्यमातून सुमारे 100 पेक्षा जास्त वाहनांसाठी सभासदांना कर्ज वितरण केलेले आहे, आजमितीस बँकेकडे 150 कोटी रुपयांच्या ठेवी असून 94 कोटीचे कर्ज वितरण केलेले आहे. सातारावासियांनी दाखविलेल्या विश्वासावरच बँकेने प्रगती साधली असून बँकेच्या विविध ठेव व कर्ज योजनांचा लाभ सभासदांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
बँकेचे सभासद किशोर ननवरे यांनी संचालक सदस्य व अधिका-यांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद देऊन बँकेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बँकेच्या भागधारक पॅनेलचे पॅनेलप्रमुख विनोद कुलकर्णी, चेअरमन अतुल जाधव, सेवक संचालक अनिल जठार व अनिल चिटणीस, व्यवस्थापक प्रशांत शास्त्री, उपव्यवस्थापक प्रशासन विभाग मच्छिंद्र जगदाळे, उपव्यवस्थापक कर्ज विभाग सलीम बागवान, पोवई नाका शाखेचे उपव्यवस्थापक विजय देवी, बँकेचे इतर अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होता.