लाच खोरआरोग्य निरीक्षकांची होणार आता विभागीय चौकशी नगरपालिका प्रशासनही उलगडणार महत्वाचे दुवे आस्थापनेकडून टिप्पणी आरोग्य विभागाला रवाना

52
Adv

सातारा पालिकेची इभ्रत वेशीला टांगणाऱ्या आरोग्य विभागाच्या लाच प्रकरणाची विभागीय समितीच्या माध्यमातून केली जाण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत . आस्थापना विभागाने चौकशी कोणत्या मुद्यांवर केली जावी याची विचारणा करणारी टिपणी आरोग्य विभागाला सादर केल्याची खात्रीलायक माहिती आहे . मात्र समिती चे प्रमुख कोण असणार हे मात्र अद्याप निश्चित झालेले नाही

सातारा पालिकेच्या उपमुख्याधिकाऱ्यासह आरोग्य विभागाचे तीन लाच खोर निरीक्षकांना दीड महिन्यापूर्वी सव्वादोन लाखाच्या लाच प्रकरणात अटक झाली होती . या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया वगळता धूळ आता खाली बसत चालली असून चार अभियुक्त सध्या केवळ हजेरीसह अर्धा वेतनावर आहेत .

मात्र ही घटना तळात जाऊन शोधण्याचा चंग सातारा पालिका प्रशासनाने बांधला आहे . मुख्याधिकारी रंजना गगे यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन पुढील हालचाली करण्याच्या सूचना बैठकीत दिल्याचे वृत्त आहे . या पुढील हालचाली म्हणजे पालिका प्रशासनाने या प्रकरणातील निलंबित आरोग्य निरीक्षकांची कसून चौकशी करून त्याचा स्वतंत्र अहवाल बनवण्याचा निर्णय केल्याच्या एकंदर हालचाली आहेत . तशा स्वरूपाची टिपणी बनविण्यात आली असून या टिपणी मध्ये चौकशीचे काय मुद्दे असावेत याची विचारणा करणारी टिप्पणी आस्थापना विभागाने आरोग्य विभागाला रवाना झाल्याची माहिती आहे मात्र आस्थापना विभागाने मात्र या विषयावर मात्र चुप्पी साधली आहे .

मूळ तक्रारदाराला संबधित प्रकरणातील संभाषणाच्या ध्वनीमुद्रित फोन रेकॉर्ड व इतर महत्वाची कागदपत्रे मागण्यात आली आहेत . सव्वादोन लाखाची रक्कम कोणत्या कारणासाठी दिली याचे कारण तक्रारदाराच्या मूळ तक्रारीत आहे . या तक्रारीचा सातारा पालिका मात्र आणखी खोलात जाऊन चौकशी करणार आहे . त्यासाठी असणारी समिती प्रशासकीय असणार की त्यामध्ये पदाधिकाऱ्यांचाही समावेश असणार हे मात्र अद्याप ठरलेले नाही .

Adv