सातारा पालिकेच्या वाहतूक विभागाचा भोंगळ कारभार आता समोर येऊ लागला आहे वाहतूक विभाग की कॅरमचा अड्डा अशी म्हण्याची वेळ सातारकरांवर आली आहे सातारा शहरात शासकीय ऑफिसमध्ये कॅरमचा अड्डा केल्याने भल्याभल्यांच्या भुवया उंचावल्या आहेत
मोती तळ्या शेजारील वाहतूक विभागाच्या ऑफिस मधून शहराच्या पाण्याचे नियोजन चालते ( फक्त पांढऱ्या पाण्याचे) तेही मर्जीतील लोकांना फक्त टँकरने पाणीपुरवठा केला जातो मात्र हे ऑफिस आता कॅरमचा अड्डा झाला असल्याचे दिसून येते काम कमी आणि कॅरम जास्त असे चित्र विभागात दिसून येत आहे पाण्याचा टॅंकर सर्वसामान्य नागरिकांनी मागवला तर त्याला नगरसेवक आडवे पडतात हे सातारकरच दुर्दैवच म्हणावे लागेल त्यात वाहतूक विभागाने आपले ऑफिस नसून कॅरम चा अड्डा केल्याचे चित्र वाहतूक विभागात दिसून येते
वाहतूक विभागाचा सावळा गोंधळ इथून पुढे सातारानामा सातारकरां पुढे आणणार हे नक्की असून वाहतूक विभागाचे पाणी नक्की कुठे मुरते हे कळेल