सातारा पालिकेचे आरोग्य निरीक्षक यांच्यावर सातारा विकास आघाडी व पालिका प्रशासन कोणतीच कारवाई करत नसल्याने सत्ता कोणाची राजेंची का आरोग्य निरीक्षक याच्या मंत्र्याची हा खरा प्रश्न सातारकर जनतेला पडला आहे
तीन वर्षापूर्वी सातारकर नागरिकांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर विश्वास ठेवून पालिकेत सत्ता दिली तीन वर्षाच्या काळात सातारकरांना विविध विकासाची कामे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून सातारा शहरात केलेली दिसून आले मात्र सातारा पालिकेतील सर्व पदाधिकारी आपण राजेंच्या सातारा विकास आघाडीतून निवडून आलो आहोत हे मात्र विसरायला लागले असल्याचे दिसून येते त्याला कारण ठरले आहे ते एक आरोग्य निरीक्षक या आरोग्य निरीक्षकांवर कारवाई करण्याचे धाडस सातारा विकास आघाडीतील कोणत्याच पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये नसल्याचे दिसून येते आणि संबंधित आरोग्य निरीक्षक आपल्याला एका मंत्र्याचा राजकीय व गृह आश्रय असल्याच्या अविर्भावात दिवसभरात तो पालिकेत वावरत असतो त्यामुळे तुम्हीच सांगा पालिकेत सत्ता कोणाची राजेंची का मंत्र्याची
सातारकरांचा विश्वासाला खा श्री छ उदयनराजे भोसले यांनी कधीच तडा जाऊ दिलेला नाही व ते जाऊही देणार नाहीत हे मात्र नक्की असले तरी त्यांच्या पालिकेतील नगरसेवक नगरसेविका सभापती व पदाधिकारी मंत्र्यांच्या भिती पोटी संबंधित आरोग्य निरीक्षकावर कारवाई करत नसल्याचे स्पष्ट दिसुन येते आता सर्वमान्य साताराकर हेच विचार करत आहेत की संबंधित आरोग्य निरीक्षकावर सातारा विकास आघाडी ने कारवाई करावी व ठाम पणे सांगावे पालिकेत सता ही राजेंचीच
वॉर्डात विकास कामे व निधी आण्यासाठी नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरू असलेला आपण बघत असतो मात्र सातारकर नागरिकांच्या आरोग्याच्या जीवाशी खेळणाऱ्या आरोग्य निरीक्षका बरोबर झिम्मा फुगडी खेळणारया पालिकेतील सर्व पदाधिकाऱ्यांना हे लक्षात येईल का की सत्ता ही सातारकरांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे बघून दिली आहे मंत्र्याकडे बघून नाही म्हणून म्हणतो राजेंना शोभल असे काम करा व त्या आरोग्य निरीक्षकांवर कारवाई करून समस्त सातारकरांची कॉलर टाईट करा