सातारा पालिकेच्या विविध विषयांच्या सभापती निवडी बिनविरोध पार पडल्या असून या सभापती निवडीत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपला संधी दिली आहे
आज झालेल्या विविध सभापती निवडीमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बांधकाम सभापती पदावर भाजपचे मिलिंद काकडे यांना संधी दिली तसेच आरोग्य सभापती पदी आनिता घोरपडे, पाणीपुरवठा सभापती पदी यशोधन नारकर तर शिक्षण मंडळ सभापती पदावर उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांची फेर निवड करण्यात आली असून महिला बालकल्याण सभापती सुनीता पवार व नियोजन सभापती फरांदे यांना मुदतवाढ दिली आहे स्थायी समितीवर नगर विकास आघाडी तर्फे दीपलक्ष्मी नाईक यांना संधी मिळाली आहे
आज झालेल्या निवडीवर कभी खुशी कभी गम चे वातावरण सभागृहात दिसून आले साताऱ्यात एकही खड्डा दिसणार नसल्याचे बांधकाम सभापती मिलिंद काकडे यांनी सांगितले सभापती निवडीनंतर नगराध्यक्ष माधवी कदम यांनी सर्व सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले