श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व श्रीमंत छत्रपती सौ दमयंतीराजे भोसले यांनी आरोग्य सभापती पदाची संधी दिली त्याचे नक्कीच सोन करणार असल्याचे मत नूतन आरोग्य सभापती अनिता अशोक घोरपडे यांनी सातारानामा शी बोलताना सांगितले
सातारा नगरपालिका ही स्वच्छ सर्वेक्षण मध्ये कशी आघाडीवर राहील तसेच शहर कसे स्वच्छ राहील यावर लक्ष केंद्रित करणार असून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मनातील स्वच्छ सातारा सुंदर सातारा हेच धोरण ठेवून काम करणार असल्याचे ही आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनी यावेळी सांगितले
त्यांच्या निवडीबद्दल फोनवरून राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांनी अभिनंदन केले असून सर्व नगरसेवकांना घेऊन काम करणार असल्याचे ही सभापती घोरपडे यांनी यावेळी सांगितले