निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत करावी  विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

75
Adv

45- सातारा लोकसभा पोटनवडणूक व विधानसाभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कुठेही  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची पोलीस विभागाने दक्षता घ्यावी. या कामांसाठी पोलीस विभागाला सर्व ती सहाकर्य करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज केल्या.

लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज जिलहाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी  सातपुते, विभागीय आयुक्त कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजयसिंह चव्हाण,  महसूल विभागाचे उपायुक्त प्रताप जाधव, आचार संहिता पक्ष प्रमुख तथा अपर जिलहाधिकारी  रामचंद्र  शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह विविध कक्षांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक कामांसाठी असणारे सर्व अधिकारी, कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट पेपर   व्यवस्था करावी त्याचा अहवाल वेळोवेळी द्यावा, अशा सूचना करुन आयुक्त डॉ. म्हैसेकर पुढे म्हणाले, प्रत्येक मतदाराला वोटर स्लीप दिली  पाहिजे, 100 टक्के वोटर स्पीप वाटप झाली पाहिजे यासाठी नियोजन करा. ज्या मतदान केंद्रावर मतदान कमी झाले आहे अशा मतदान केंद्रावर मतदान वाढण्यासाठी  जनजागृती करावी. विविध माध्यमांतून मतदारांशी संपर्क करा तसेच महिलांचा मतदानाचा टक्का वाढण्यासाठीही विशेष प्रयत्न करावेत.

Adv