प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नव्या चेहऱ्यांना संधी देणार

60
Adv

 राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दमदार यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रदेशा पातळीवर संघटनात्मक बांधणीला जोर दिला आहे. राज्यातील सर्व फ्रंटल प्रमुखांची बैठक घेण्यात आली. जयंत पाटील म्हणाले की, विधानसभा काही ठिकाणी संघटनात्मक कामात आपण कमी पडलो. शहरांमध्ये आपल्या जागा कमी आल्या. एकेकाळी शहरांमध्ये आपली ताकद होती. या सगळ्यांवर मात करत आपल्याला पुढे जायचं आहे. निवडणुकीत यश आलं नाही तरी तुमच्यावर येत्या काळात महत्त्वाची जबाबदारी टाकली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार तुम्हाला जनतेच्या मनात रुजवायचे आहेत. त्यामुळे आपण कामाला लागले पाहिजे.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व फ्रंटल सेल प्रमुखांसोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

Adv