Saturday, April 25, 2026
spot_img
Home Satara District राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आ शशिकांत शिंदे एकाकी? आ शिंदे यांनी भाजपाची ऑफरही धुडकावली...

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आ शशिकांत शिंदे एकाकी? आ शिंदे यांनी भाजपाची ऑफरही धुडकावली होती हाच निर्णय अंगलट आला का?

743
Adv

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख आहे याच जिल्ह्यात राष्ट्रवादीचा वाघ म्हणून ज्यांना समजले जाते ते विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे हे बालेकिल्ल्यातच एकाकी पडल्याचे दिसून येते त्याला निमित्त ठरले आहे ते सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक

1999 ते आज पर्यंत आमदार शशिकांत शिंदे राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत या एक निष्ठेचे फळ म्हणून त्यांना कोरेगाव विधानसभा मतदार संघात एकटे पाडून त्यांचा पराभव करण्यात कोण कोण सामील होते हे जिल्ह्यासह महाराष्ट्रालाही माहिती आहे .सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच आमदार शशिकांत शिंदे यांना आव्हान निर्माण झाले असून वाशी ते सातारा सह अंतर्गत रचलेल्या चक्रव्यूहात ते आत्ताच्या घडीला अडकले असल्याचे चित्र दिसत आहे 1999 पासून आमदार शशिकांत शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्ष वाढावा हेच प्रयत्न केले त्यामुळेच की काय त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत झगडावे लागत असल्याचे दिसून येते

भाजपची ऑफर असतानाही आमदार शशिकांत शिंदे राष्ट्रवादीबरोबर

गेल्या दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील बड्या बड्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आमदार शशिकांत शिंदे यांनाही भारतीय जनता पार्टीची ऑफर होती हे त्यांनी अनेकदा स्वतःच्या भाषणातही सांगितले आहे की मला भारतीय जनता पार्टीची ऑफर होती परंतु आमची निष्ठा आदरणीय शरद पवार साहेब यांच्या बरोबर आहे त्यामुळे आम्ही कोणत्याही पक्षाचा विचार करणार नाही हाच निर्णय त्यांना आता अंगलट आला की काय अशी चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे

Adv