Saturday, April 25, 2026
spot_img
Home Satara District Satara City डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार बंद करणाऱ्या नगरपालिकेच्या विरोधात करणार आत्मक्लेष आंदोलन...

डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार बंद करणाऱ्या नगरपालिकेच्या विरोधात करणार आत्मक्लेष आंदोलन -सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे

440
Adv

ऐतिहासिक आणि क्रांतिकारकांच्या भूमीत जन्म घेऊन अंधश्रद्धा आणि व्यसनमुक्तीसाठी कार्य करुन समाजाला विवेकी करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नावाने नगरपालिकेच्या वतीने देणारा पुरस्कार गेली तीन वर्षे दिला नाही. सामाजिक क्षेत्रात सातारची ओळख सर्वदूर निर्माण करणाऱ्या डॉक्टरांच्या जन्मभूमीतचं नगरपालिकेकडून डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्काराची परंपरा खंडित केली गेली.हा पुरस्कार बंद केल्याच्या निषेध म्हणून डॉक्टरांच्या कार्याचा तिटकारा वाटणाऱ्या सातारा नगरपालिकेच्या इमारतीत दि.१ डिसेंबर रोजी डॉ. दाभोलकरांची प्रतिमा ठेवून त्यासमोर आत्मक्लेष आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी इशारा दिला आहे.
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात महान कार्य करणाऱ्या डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची दुर्देवी हत्या झाली. त्यानंतर सातारचे सुपुत्र असलेल्या डॉ. दाभोलकर यांच्या कार्याचा ठेवा चिरंतन रहावा,यासाठी सातारा नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार दरवर्षी देण्याचे निश्चित केले आहे. आतापर्यंत हा पुरस्कार प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते डॉ.अभय बंग व डॉ. राणी बंग, डॉ. प्रकाश आमटे व डॉ.सौ. मंदाकिनी आमटे,डॉ.जयंत नारळीकर व डॉ. सौ. मंगला नारळीकर, डॉ. रघुनाथ माशेलकर अशा महान विभुर्तीना हा
रक्कम रु.१ लक्ष आणि सन्मान चिन्ह असा पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.पुरस्कार स्विकारताना प्रत्येक विभूतीने सातारच्या मातीतील डॉ. दाभोलकर यांच्या अतुलनीय कार्याची महती सांगून त्यांनी अंधश्रद्धा आणि व्यसनमुक्तीसाठी कार्य करुन समाजाला डोळस बनवले. मात्र सातारा नगरपालिकेने मोठा गवगवा करून त्यांच्या नावाने सुरू केलेला पुरस्कार गेली तीन वर्षापासून बंद केला आहे. याचा सुशांत मोरे यांनी निषेध व्यक्त केला आहे.

दि.१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. नगरपालिकेच्या इमारतीत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची प्रतिमा ठेवून त्यासमोर आत्मक्लेष आंदोलन करणार आहे.गेली तीन वर्षाचे राहिलेले आणि यावर्षीचा पुरस्कार वितरण करण्याचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सुशांत मोरे यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी पत्र पाठवून कळवले आहे.

चौकट -१

“एकटे नाही तुम्ही साथ आहोत आम्ही”

डॉ. दाभोलकर यांच्या नावाने दिला जाणारा स्मृती पुरस्कार हा सातारकरांच्या वतीने सन्मान आहे. डॉक्टरांच्या कार्याबद्दल सातारकरांना सदैव अभिमान वाटतो. मात्र नगरपालिकेला त्यांच्या कार्याचा तिटकारा वाटू लागला की काय, असा समज पुरस्कार बंद केल्याने झाला आहे. यामुळे सुशांत मोरे यांच्या आत्मक्लेष आंदोलनात विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांनी “एकटे नाही तुम्ही साथ आहोत आम्ही ही ” असा नारा देत आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे.

चौकट-२

अमोल मोहिते शांत का?

या पुरस्कारासाठी उपनगराध्यक्ष असताना अमोल मोहिते यांनी विशेष ठराव हि केला आणि त्यांच्या कारकिर्दीत तो सुरु ही झाला. मात्र गेली तीन वर्षे हा पुरस्कार वितरण केला गेला नाही. आणि तो बंद केला तरीही अमोल मोहिते शांत का आहेत. याचा उलगडा होत नाही.

Adv