नक्षत्र संस्थेने केली किराणा किट वाटून गरजूंना मदत

47
Adv

श्रीमंत छत्रपती सौ दमयंतीराजे भोसले यांच्या नक्षत्र संस्थेच्या वतीने साताऱ्यातील गरजूंना किराणा किटचे वाटप करण्यात आले

साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांची नक्षत्र संस्था कोरोना च्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील गरजू कुटुंबांना एक वरदान ठरणारी संस्था ठरली आहे या संस्थेच्या माध्यमातून साताऱ्यातील गोरगरीब जनतेला किराणा किट वाटप केल्याने गोरगरीब जनतेतून श्रीमंत छत्रपती सौ दमयंतीराजे भोसले यांचे आभार सर्वसामान्य कुटुंबाने मानले असून गोरगरिबांसाठी ही संस्था इथून पुढेही मदत करणार असल्याचे नक्षत्राच्या संस्थापिका श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांनी सांगितले आहे

नक्षत्र संस्थेच्यावतीने दरवर्षी मोठा महोत्सव आयोजित करण्यात येत असतो मात्र यंदाच्या वर्षी कोरोना या पार्श्वभूमीवर रद्द करून एक आगळा वेगळा पायंडा ही या संस्थेने रचला आहे यापुढेही गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबांना मदत करण्यास ही संस्था कायम अग्रेसर राहील अशी माहिती नगरसेविका स्मिता घोडके यांनी यावेळी दिली

Adv