आज कोरोना सारख्या महामारी ने जगात सगळीकड़े थैमान घातले असताना हजारो ड़ाॅक्टर नर्सेस आपला जिव धोक्यात घालुन घरदार मुले बाळे सोड़ुन हे कार्य समाजासाठी करत आहेत अशाच साताऱ्यातील एस.टी काॅलनी भागा मध्ये राहणाऱ्या ड़ाॅ. सोनल संग्राम मुंढेकर नोड़ल ऑफीसर म्हणुन सायगाव येथे कार्यरत असून त्यांच्या या कार्याची नोंद घेवुन तब्बल सात दिवसानंतर आज घरी येताना धर्मवीर संभाजीराजे जिमखाना व कॉलनीतील जेष्ठ नागरिक यांनी फुले उधळून स्वागत केले यावेळी नगरसेवक अमोल मोहिते व कॉलनीतील जेष्ठ नागरिक उपस्थित होते
सर्वप्रथम निझरे जावली येथे कोरोना बाधित पेशन्ट सापडल्यावर तेथील सर्व वैद्यकीय अधिकारी व स्टाफ यांना विलगिकरन करणेत आले तेंव्हा त्याठिकाणी 1 आठवडा व कुसुंबी ता. जावली येथे 1 आठवडा वैद्यकीय सेवा बजावली. त्यानंतर छाबडा कॉलेज रायगाव ता. जावली येथे कोव्हीड केअर सेंटर चालू करणेत आले,
सदर कोव्हिडं केअर सेंटर रायगाव च्या नोडल ऑफिसर पदी नेमणूक झाली, नोडल ऑफिसर ची जबाबदारी महिला असूनही सक्षमपणे पेलत तेथील बाधित व विलगिकरन केलेल्या पेशन्टची सेवा करत कर्त्यव पार पाडले, व 7 दिवसांची ड्युटी संपवून आज रोजी त्या घरी आल्या, तेंव्हा त्यांचे धर्मवीर संभाजीराजे जिमखाना एसटी कॉलनी येथील नागरिक यांनी त्यांचे फुले टाकून व टाळ्या वाजवून स्वागत केले व करत असलेल्या कामाचे कौतुक केले, दोन लहान मुली असताना देखील त्या करत असलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे