महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने सर्वत्र थैमान घातला असून त्यामध्ये माढा मतदारसंघातील दुष्काळी तालुके ही सुटलेली नाहीत शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यानिमित्ताने म्हाडा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे
त्याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याबाबत तसेच शेतकऱ्यांना विमा कंपनी यांच्याकडून मदत मिळावी तसेच प्रशासनाला सक्त सूचना देण्याबाबत निवेदन देऊन त्यांची भेट घेतली आहे तसेच फलटण तालुक्यातील व माण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व बळीराजाचे जे नुकसान झालेले आहे त्याची प्रत्यक्ष पाहणी करून लोकांना दिलासा देण्याचे काम केलेला आहे परंतु काही खोडसाळ लोकांनी सोशल मीडियावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची पोस्ट व्हायरल करून चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे
यापूर्वी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली त्या काळात स्वतःच्या खिशातून 25 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आणि वस्तू स्वरूपात 25 लाख रुपयाचे सामान दिले असे स्वतःच्या खिशातील पन्नास लाख रुपयाची मदत केली, मतदारसंघातील पंढरपूर असेल सांगोला असेल माढा,करमाळा मान, फलटण व माळशिरस असेल या भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा केलेले आहेत व लोकांना स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत केली , गारपीट झाल्यानंतर माढा विधानसभा मतदासंघात दुसऱ्याच दिवशी अनेक गावांमध्ये स्वतःकडील लाखो रुपयांची मदत केली , तसेच खासदार झाल्यापासून नीरा देवधर सारखा मोठा पाण्याचा प्रश्न सोडवून उजनी व नीरा उजवा कालवा या दोन्ही केनोल मधून शेवटा कडून सुरुवातीपर्यंत (टेल टू हेड) पाण्याचे व्यवस्थापन पाटबंधारे विभागाला करायला सांगून भूतो न भविष्यते पाणी माढा मतदारसंघात आणले आहे मतदारसंघातील बहुतांशी तलाव भरून घेतले आहेत हे नाकारता येणार नाही, फलटण लोणंद रेल्वे सुरू करण्याचा प्रश्न , बाराशे कोटी रुपये पंढरपूर पालखी मार्गावरील शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला म्हणून मजूर केले, मतदार संघातील रस्त्या साठी लागणारा शेकडो कोटींचा निधीचे प्रपोजल्स शासनाकडे पाठवले, तसेच माण तालुक्यातील दुष्काळी तालुक्याला वरदान ठरणारी जिहे कटापूर योजना मंजूर करण्यासाठी घेतलेले कष्ट असतील, तसेच शिरवळ लोणंद रस्त्यासाठी लागणारा निधी असेल, सांगोला तालुक्यातील दुष्काळी भागांमधील छावण्या असतील अधिकाऱ्यांना सक्त सूचना देऊन मतदारसंघातील बुधियाळ तलाव असे अनेक तलाव अधिकाऱ्यांना धारेवर धरून भरून घेतले,अनेक ठिकाणी आढावा बैठक घेऊन दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यामध्ये खासदार साहेबांनी योगदान दिलेले आहे, तसेच माढा मतदरसंघातील रेल्वेच्या बाबत असणारा प्रश्न असेल कृष्णा भीमा स्थिरीकरण यासाठी सातत्याने केलेला पाठपुरावा असेल असे अनेक कामे मार्गी लावण्यामध्ये खासदार साहेब काम करत आहेत परंतु काही अल्पसंतुष्ट लोकांनी अशा पद्धतीच्या पोस्ट व्हायरल करून काम करत असणाऱ्या माणसावर जाणीवपूर्वक शिंतोडे उडविण्याचा गलिच्छ प्रयत्न केला जात आहे त्यांना बदनाम केले जात आहे .
माण तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा आटपुन अचानक पाठीचा त्रास चालू झाला आणि त्यानिमित्ताने त्यांना मुंबई येथे दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी त्यांना जावे लागले लवकरच पुन्हा एकदा माढा मतदारसंघातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा दौरा करणार आहेत याबाबत सोलापूर जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासनाला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तशा फोनवरून सूचना देऊन जास्तीत जास्त पंचनामे झाले पाहिजेत शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत