नुकताच ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असून या मंत्रिमंडळामध्ये अजितदादासह जिल्ह्याला पाच मंत्री मिळाले आहेत
मंत्रिमंडळ विस्तार मध्ये अजितदादांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली असून अजित दादांचे मुळगाव हे सातारा जिल्ह्यातील नांदवळ हे होय दादांना उप मुख्यमंत्री पद मिळाले आहे़़
तसेच कॅबिनेट मंत्री म्हणून कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी शपथ घेतली असून त्यांना सहकार व पणन खाते मिळण्याची शक्यता आहे जेष्ठ नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडीत मंत्रीपद देवून आमदार पाटील यांच्या पक्षनिष्ठेचा गौरव केल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे.
त्याचबरोबर दरे बुद्रुक बामनोली येथील रहिवासी असलेले एकनाथ शिंदे यांनीही या अगोदरच कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली असून त्यांना नगरविकास खाते देण्यात आले आहे एकनाथजी शिंदे ठाणे जिल्ह्यातून पाचाडी या मतदारसंघातून निवडून येतात
तसेच सातारा तालुक्यातील कोंढवे गावच्या रहिवासी असलेल्या परंतु मुंबई येथील धारावी मतदारसंघातून वर्षा गायकवाड या निवडून येतात त्यांना महिला व बालकल्याण खाते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू असलेले पाटण चे शिवसेनेचे आमदार शंभूराजे देसाई यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यांना पर्यटन किंवा संसदीय कार्य हे खात मिळण्याची शक्यता आहे सन 2009 मध्ये त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह पाटणकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर देसाई यांनी पून्हा सन 2014 व सन 2019 मधील निवडणूकांमध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून येण्याची किमया साधली.
दरम्यान आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर जिल्ह्याचा वरचष्मा असल्याचे दिसून आले असून याचा कितपत फायदा जिल्ह्याला होतोय हे आता बघणे उत्सुकतेचे असेल