सांगा मंत्री महोदय 144 कलम तुमच्या शेजारील नागरीकांना लागू नाही का

60
Adv

महाराष्ट्राचे गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई राज्याचा गाडा हा आपल्या पोवई नाका निवास स्थानातून चालवताना दिसतात मात्र याचा फायदा त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी घेतला असल्याचे दिसून येते

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर फक्त सातार्‍यात नव्हे तर पूर्ण देशात संचार बंदी लागू आहे राज्याचे गृहराज्यमंत्री आमदार शंभूराजे देसाई हे एक उत्तम प्रशासन चालवत असल्याचे आपण पाहत आहोत मात्र याचा फायदा काही लोकांनी घेतला असून स्वतःबरोबर त्यांनाही 144 कलमा चे उल्लंघन करण्यास भाग पडतात की काय अशी चर्चा साताऱ्यात रंगू लागली आहे व कायदा फक्त सर्वसामान्य नागरिकांनाच का मंत्रीमहोदयांच्या शेजारील नागरिकांना नाही का असा सवाल रोज पोवई नका येथून येणाऱ्या जाणार्‍या नागरिकांकडून विचारला जात आहे

मंत्रीमहोदयांच्या शेजारी अंतर ठेवून बसलेले एक महाशय दुबई वारी करून नुकतेच आले असून त्यांची गाथा रोज सातारानामा मध्ये वाचली जातच आहे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी राज्याचा गाडा पोवई नाका येथून हाकल्यास नक्कीच सातारकरांची मान उंच होत आहे त्यात तिळमात्र शंका नाही मात्र 144 कलम म्हणजेच जमावबंदी चे उल्लंघन तर होत नाही ना याचा विचार शेजारील नागरिकांनी करायला हवा संचार बंदीच्या काळात तरी मंत्री महोदय यांना सोडा व तुम्ही सुद्धा सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे घरी बसा असा सवाल नागरिक करत आहेत मंत्रीमहोदयांच्या शेजारी बसण्यास कोणाची हरकत नाही मात्र सर्वसामान्य व्यक्ती बाहेर दिसली तर पोलीस दादा त्याच्यावर कारवाई करतोय मग आपण गृह राज्यमंत्र्यांच्या शेजारी बसलो म्हणून आपल्याला कायदा वेगळा अशा अविर्भावात काही महाशय वावरताना दिसून येत आहेत

संचारबंदीचे उल्लंघन करुन विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येत असून सुमारे ५०० गुन्हे या काळात नोंद झाले आहेत एकावेळी एका गुन्हयामध्ये १०० ते १२५ व्यक्तींचा समावेश आहे,अशी माहिती जिल्हा पोलीस दलाकडून मिळाली आहे

गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी वाशिम पॅटर्न राबवून एक आगळा वेगळा ठसा हा आपला राज्यात उमटवला आहे त्यात तिळमात्र शंका नाही सातारकर नागरिकांना मंत्री महोदय यांचा नक्कीच अभिमान आहे की आपल्या साताऱ्यातून राज्याचा गाडा हा हाकला जातोय सर्वसामान्य माणूस आज रस्त्यात दिसला तर त्याची गाडी जप्त होते बरेच गुन्हे 144 कलमाच्या अंतर्गत राज्यात दाखल सुद्धा झालेले आहेत म्हणून म्हणतो कायदा फक्त सर्वसामान्यांनाच का शेजारी बसलेल्यांना नाही का

Adv