मांढरदेव ता. वाई येथे श्री काळूबाई देवीची यात्रा व दावजी बुवा यात्रा, सुरुर दि. 9, 10 व 11 जानेवारी 2020 रोजी रोजी संपन्न होत आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी दि. 1 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2020 या कालावधीत रणजित भोसले, तालुका कार्यकारी दंडाधिकारी, वाई यांनी कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये खालीलप्रमाणे निर्बंध आदेश जारी केले आहेत.
मांढरदेव परिसरात यात्रा कालावधीमध्ये पशुहत्या करणेस मनाई करणेत आलेली आहे. मांढदेव परिसरात कोंबड्या, बकऱ्या, बोकड इ. पाण्याचा बळी देणेस, हत्या करणेस तसेच वाहनातुन यात्रेच्या ठिकाणी घेऊन जाणेस मनाई, प्रतिबंध करणेत आलेले आहे. मांढदेव परिसरात व वाद्य आणणेस व वाजविणेस बंदी करणेत आलेली आहे. मांढरदेव परिसरात तसेच देवालयाचे परिसराम असणाऱ्या झाडांवर खिळे ठोकणेस, लिंबु टाकणे, काळ्या बाहुल्या, बिबे, भानामती करणे, करणी करणेस, प्रतिबंध करणेत आलेला आहे. मांढरदेव मंदिर परिसरामध्ये नारळ फोडणे, तेल वाहणेस पुर्ण बंदी करणेत आली आहे. मांढदरेव परिसरात दारु जवळ बाळगणे, वाहतुक करणे, विक्री करणेस प्रतिबंध करणेत आलेला आहे. हे आदेश दि.1जानेवारी 2020 रोजी 0.00 वा.पासुन ते दि. 7 फेब्रुवारी 2020 रोजीचे 24.00 वा. पर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे जे कोणी उल्लंघन करेल तो भारतीय दंड संहिताचे तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील असेही, रणजित भोसले तालुका कार्यकारी दंडाधिकारी, वाई यांनी कळविले आहे.