आजच्या स्पर्धात्मक युगात कुटूंब चालवताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. गोर- गरीब आणि सर्वसामान्य कुटूंबांमध्ये एकटा पुरुष कमवता असेल तर, आर्थिक चणचण भासते आणि कुटूंबातील इतर घटकांच्या गरजा पुर्ण होत नाही. त्यामुळेच अनेक कुटूंबातील मुले शिक्षणापासून वंचीत राहतात. कुटूंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहणे काळाची गरज आहे. महिलांनी स्वावलंबी बनून कुटूंबाच्या प्रगतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन राजमाता श्रीमंत छ. सुमित्राराजे भोसले बहुउद्देशीय स्वयं. महिला बचत गट ङ्गेडरेशनच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
कामाठीपुरा येथे सावित्रीबाई ङ्गुले महिला बचत गटातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणसाठी त्यांना शिलाई व्यवसाय करता यावा यासाठी सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी या गटास १० शिलाई मशिन भेट दिल्या. याप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी गटाच्या अध्यक्षा कमल माळी, रेखा कुडाळकर, उषा कुडाळकर, उमा कुडाळकर, कोयना जावलीकर, रोशन मोरे, स्वाती मोरे, सुरेखा मोरकर, रोहिणी जावलीकर, रोशन माळी यांच्यासह गटातील महिला मोठ्या सं‘येने उपस्थित होत्या.
आज महागाईमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. रोजंदारी, मजुरी करणार्या गोर- गरीब घरातील मुलांना शिक्षणापासून वंचीत रहावे लागते. घरातील कमवत्या पुरूषाला कुटूंबाचा गाडा हाकताना अनंत अडचणी येतात. अशा कुटूंबाना आर्थिक सबल करण्यासाठीच महिला बचत गट महत्वाचे आहेत. सावित्रीबाई ङ्गुले महिला बचत गटातील महिला जिद्दी आणि कष्टाळू आहेत. या बचत गटाला व्यवसायासाठी १० शिलाई मशिन दिल्या आहेत. गटातील महिलांनी लवकरात लवकर शिलाई काम शिकावे यासाठी त्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. या गटातील महिलांनी शिलाई व्यवसायातून स्वत:च्या पायावर उभे रहावे. शिलाई व्यवसायातून या बचत गटातील महिलांची आर्थिक उन्नती आणि सबलीकरण होणार असून कुटूंबाला आर्थिक हातभार लागणार आहे. अजून हवी ती मदत आपण महिलांना करणार असून महिलांनी चूल आणि मूल यात न अडकता स्वावलंबी बनून स्वत:ची आणि कुटूंबाची प्रगती साधावी, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी केले.