राज्यात वाढत्या महिला अत्याचार विरोधात जिल्ह्यातील राष्ट्रवादी महिला आघाडी व राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडी च्या पदाधिकारी गप्पा बसल्याच्या दिसून आल्याने दोन्ही काँग्रेस महिला आघाडी बाबतीत जिल्ह्यातून रोष व्यक्त होत आहे
महाराष्ट्रात वाढत्या महिला अत्याचारा विरोधात महाराष्ट्रातून निषेध होत आहे सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा असून याच जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला पार्टीचे अध्यक्ष समिंद्रा जाधव व काँग्रेसचे अध्यक्ष महाडिक गप्प का बसल्या हेच कळून आले नाही .इतर वेळेस विविध प्रश्नांवर आंदोलने व निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष जाधव यापुढे असतात तसेच काँग्रेसचे अध्यक्ष ही तत्परतेने आपली कार्य तत्परता दाखवतात वर्ध्याच्या घटनेचा साधा निषेधही नोंदवला नसल्याने दोन्ही महिला आघाडीच्या अध्यक्षांना रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे
दुर्दैवी घटना वर्ध्यात घडली असून संबंधितांना फाशीच झाली पाहिजे अशी मागणी साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे मात्र नेत्यांच्या मागे पुढे करणाऱ्या महिला अध्यक्षांना त्याचे गांभीर्य कधी येणार हा खरा प्रश्न उभा राहिला आहे