जिहे काठापूर चे पाणी आंधळी धरणाजवळ आल्यावर ग्रामस्थांनी पाण्याचे पुजन करून जलनायक आमदार जयकुमार गोरे यांचे आभार मानले…
१४ वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे जिहेकठापूरचे पाणी आले आणि आमदार जयाभाऊंनी जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला. जिहे कठापूर सिंचन योजनेचे पाणी आज आंधळी गावात पोहोचले. गावातिल ग्रामस्थ बंधु भगिनींनी पाण्याचे पूजन करून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसमवेत आनंदोत्सव साजरा केला.
शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून या दिवसाची वाट पाहत होते.अखेरीस शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा संपली असून आमदार मा.श्री.जयकुमार गोरे यांनी त्यांना दिलेला शब्द पूर्ण केला या बद्दल आमदार मा.श्री.जयकुमार गोरे यांचे सर्व जनतेने आभार व्यक्त केले.