22 कामांना, 10 कोटी 68 लाख रुपयांचा घसघशीत निधी उपलब्ध

551
Adv

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना 2023-24 अंतर्गत सातारा नगरपरिषदेच्या हद्दीमधील प्रस्तावित केलेल्या एकूण 22 कामांना,10 कोटी 68 लाख रुपयांचा घसघशीतनिधी उपलब्ध झाला असून, जिल्हाधिकारी, सातारा यांनी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे शहरात
विविध ठिकाणी या योजनेमधुन लोकहिताची विविध कामे मार्गी लागण्याबरोबरच नागरीकांना सुविधा निर्माणहोईल अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत विविध कामे प्रस्तावित करण्याबाबतआम्ही वेळोवेळीमुख्याधिकारी तथा प्रशासक यांना सूचना केलेल्या होत्या. तसेच प्रस्तावित कामांना मंजूरी मिळणेकरीता पालक मंत्री ना.शंभुराज देसाई यांना देखील प्रस्तावित कामांना मंजूरी देण्याबाबत सूचित केले
होते. त्यानुसार पालकमंत्री ना. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली लो. अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेच्या दिनांक 05/01/2024 रोजी झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या कामांना मान्यता देण्यात आलेली आहे.

या जिल्हास्तरीय मान्यतेनुसार तसेच तत्पूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधीकरण आणि नगरअभियंता,नगरपरिषद सातारा यांनी दिलेल्या तांत्रिक मान्यता,तसेच याकामांच्या नकाशांना सहाय्यक संचालक नगररचना यांनी दिलेली मंजूरी या सर्व बाबींचा विचार करुन,जिल्हाधिकारी सातारा यांनी खालील एकूण 22 कामांना,दि.22/01/2024 रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे.

Adv