भारत निवडणूक आयोगाने 45-सातारा लोकसभा पोटनिवडणूक 2019 व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार 45-सातारा लोकसभा पोटनिवडणूक 2019 व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चे मतदान विधानसभा मतदार संघामध्ये सोमवार दि. 21 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 7 ते सांयकाळी 6 वाजेपर्यत होणार आहे. निवडणुकीमध्ये मतदानाची संधी गमावू नका. मतदानाचा हक्क् बजावण्यासाठी मतदान केंद्रामध्ये आपले वैध मतदार छायाचित्र/ओळखपत्र (EPIC) सोबत घेऊन जावे.
मात्र मतदाराकडे जर वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) नसेल तर मतदारांनी पुढीलपैकी कोणतेही एक दस्तऐवज ओळखपत्र म्हणून मतदान केंद्रावर सादर करावे आणि मतदानाचा हक्क् बजावावा. यामध्ये पारपत्र (Passport), वाहन चालक परवाना (Driving Licence), केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक मर्या. कंपनी (Service Identity Cards with photograph issued to employes by Central/State Govt.IPSUs/Public Limited Companies), बँक/पोस्टाद्वारे वितरीत छायाचित्र असलेले पासबुक (Passbook with photograph issued by Bank Post Office), पॅन कार्ड (Pan card), रजिस्टार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड (Smart Card issued by RGI under NPR), मनरेगा अंतर्गत निर्गमित जॉब कार्ड (MNREGA Job Card), भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत निर्गमित हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड (Health Smart Card issued under the scheme of Ministry of Labour), छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र (Pension document with photograph), खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र (Offical Identi cards issued to MPs/MLAs MLCs), आधार कार्ड (Adhaar Card).
त्याचप्रमाणे केवळ मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) आहे म्हणून मतदान करता येईल असे नाही तर मतदार यादीत आपले नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. मतदार यादीतील आपले नाव अथवा मतदान केंद्र शोधण्यासाठी www.ceo.maharashtra.gov.in व www.nvsp.in या संकेत स्थळाला भेट द्या. मतदान केंद्रावर केवळ छायाचित्र मतदार पावती (Voter slip) ही ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही. तर त्यासोबत मतदार छायाचित्र (EPIC) किंवा उपरोक्त 11 ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र सादर करणे आवश्यक राहील. प्रवासी भारतीयांनी ओळख म्हणून केवळ पासपोर्टची मूळ प्रत सादर करणे आवश्यक राहील. अधिक चौकशीसाठी हेल्पलाईन क्र. 1950 (टोल फ्री) वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, सातारा यांनी कळविले आहे.
0 0 0 0
Home Satara District 45-सातारा लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मतदानासाठी 11 पुरावे ग्राह्य