सातारा, : विधानसभा -2019 च्या निवडणुकीबरोबर सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. सर्व यंत्रणांनी आपापसात समन्वय साधून या दोन्ही निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडा. कुणीही आदर्श आचार संहितेचा भंग करत असलेल्या त्याच्यावर तात्काळ कार्यवाही करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केल्या.
विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर पुढे म्हणाले, निवडणुकीसंदर्भात सामाज माध्यमांवर विविध मजकुर येत असतात. या माध्यमांवर करडी नजर ठेवावी. कुणी आचारसंहितेचा भंग करत असले त्याला तात्काळ नोटीस द्यावी. भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या तक्रारीसाठी सी व्हीजल ॲप कार्यान्वीत केले आहे, या ॲप कुणाच्याही तक्रारी आल्या तर त्या तक्रारीचा तात्काळ निपटारा करावा, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत केल्या.
संशयास्पद होणाऱ्या बँक व्यवहारांवर आयकर विभागाने तसेच बँकांच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवले पाहिजे, अशा बँक खात्याची माहिती तात्काळ द्यावी यासाठी महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी, असे सांगून विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर पुढे म्हणाले, विधानसभा -2019 च्या निवडणुकीबरोबर सातारा लोकसभेची पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक ते प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात यावे. तसेच भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदरासांसाठी ज्या सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले आहे त्या मतदान केंद्रावर पुरविण्यात याव्यात. तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राची प्रत्यक्ष जावून तपासणी करावी, अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी शेवटी केल्या.