कोरोना विषाणूसंसर्ग हे एक जागतिक संकट असून, त्याचा संसर्ग रोखणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक कंपनी, कारखान्यांनी आपल्या कामगारांना या काळात घरी ठेवावे आणि या काळातले वेतन त्यांना द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्याकरिता महाराष्ट्र शासनाचे सर्व नागरिकांना , कामगारांना कर्मचा-यांना आपआपल्या घरातच राहण्याची सूचना दिली आहे. अशा परिस्थितीत काही मालक आपल्या कामगारांना, कर्मचा-यांना विना पगारी सुटटीवर पाठवण्याची किंवा कामावरुन कमी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा आपत्तीचा संघटीतपणे सुजाणतेने मुकाबला करण्याकरिता प्रत्येक आस्थापना, दुकाने, संस्था तथा कारखान्यांच्या मालक तथा व्यवस्थापकांना आवाहन करण्यात येते की, अशा राष्ट्रीय आपत्तीचे वेळी कोरोना विषाणूचा संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये , प्रसार होऊ नये , याकरिता आपण नियुक्त केलेल्या प्रत्येक कामगार, कर्मचारी, कंत्राटी कामगार, रोजंदार कामगार आणि प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष केलेल्या प्रत्येक व्यक्तीला या कालावधीत गैरहजर राहिल्याबद्दल कामावरुन कमी करु नये अथवा त्यांची रजा विनावेतनी करु नये, जेणेकरुन त्यांचा रोजगार बुडुन त्यांच्या पोटापाण्याचा, उपासमारीचा प्रश्न निर्माण होणार नाही. जर असा कामगार, कर्मचारी या कारणास्तव गैरहजर राहिला तर त्यांचे वेतनात, पगारात कपात करु नये व तो सलग कामावर आहे, असे गृहीत धरावे.
या आपत्तीमुळे जर कोणा कर्मचा-याची, कामगाराची नोकरी गेली तर आर्थिक नुकसानीमुळे अशा आपत्ती विरुध्द लढण्याची त्यांची मानसिकता राहणार नाही व संसर्गाचा प्रादुर्भाव वाढून त्याचा सर्व सामाजिक जिवनावर विपरित परिणाम होईल. या करिता आपणास विनंती वजा आवाहन करण्यात येते की आपल्याकडे आस्थापनेत, दुकानात, कारखान्यात काम करणा-या प्रत्येक व्यक्तीस घराबाहेर न पडण्याची, विषाणूचा संसर्ग न वाढविण्याची सूचना द्यावी व जे गैरहजर राहतील ते कामगार आहेत, असे गृहीत धरुन त्यांचे वेतन व सेवा अखंडीत सलग राहतील याची खात्री आपण आपल्याकडे काम करणा-या प्रत्येक व्यक्तीस द्यावी. कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव रोखण्याकरिता आपण सामाजिक योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
Home Satara District कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव रोखण्याकरिता सामाजिक योगदान द्यावे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे...