कुडाळ जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक लागली असून या गटांमध्ये जुने आणि जाणते नेतृत्व असलेले मालोजी शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तळागाळातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मालोजी शिंदे ना निवडले पाहिजे आणि यासाठी मालोजी शिंदे यांना पाठिंबा आहे असे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे
विरोधात कोण आहे हे महत्वाचे नसून आपुलकी जिव्हाळा आणि विश्वासाची नाळ जोडलेली गेल्याने मालोजी शिंदे यांचा विजय निश्चित आहे मालोजी शिंदे यांना जनतेची सेवा करण्याची संधी द्या या संधीचे निश्चित सोने होणार आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी च्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच मतदार आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वबंधू-भगिनींना मालोजी शिंदे यांना बहुमताने विजय करा असे आवाहनही त्यांनी केले आहे