साविआ चे सभापती व भाजपा नगरसेविका कीट वाटपावरून नाराज

60
Adv

सातारा पालिकेचे अन्नधान्य कीट वाटप वादावादीच्या भोवऱ्यात सापडले आहे . शहराच्या हद्दीत राहणाऱ्या बऱ्याच वॉर्डात कीटच पोहोचले नसल्याची नगरसेवकांची तक्रार वादाचे कारण ठरू लागली आहे . त्यामुळे बांधकाम विभागाने नक्की कीट वाटप कोठे केले हा प्रश्न उपस्थित झाला आहे .

सातारा पालिकेला तांदूळ, गहू डाळ व इतर जिन्नस असे दहा टन साहित्य गोंदवलेकर महाराज ट्रस्ट कडून उपलब्ध झाले . या ज्ञिन्न सांचे किलोच्या प्रमाणात बांधा बांध आणि त्याचे एकत्रीकरण यासाठी स्वतंत्र वीस कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात येऊन त्याची जबाबदारी पालिकेचे मुख्य अभियंता भाऊसाहेब पाटील यांच्याकडे देण्यात आली .

आता पालिकेच्या या कीट वरून वादावादी सुरू झाली आहे . नियोजन सभापती फरांदे भाजपनगरसेविका सिध्दी पवार, दीपलक्ष्मी नाईक, नगरसेवक निशांत पाटील यांनी आमच्या वॉर्डात अन्नधान्य कीटच मिळाले नसल्याची तक्रार केली आहे . सदर बझार, लक्ष्मी टेकडी परिसर, कामगार वसाहत, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर वसाहतीच्या नागरिकांनी अद्याप कीटच पोहोचले नसल्याचा खुलासा केल्यावर पालिकेच्या अन्नधान्य वाटपाच्या मर्यादाच स्पष्ट झाल्या .

बांधकाम विभागाने शहराची हद्द सोडून थेट हद्दीच्या बाहेर म्हणजे मोळाचा ओढा,सैदापूर, खेड ग्रामपंचायत हद्द या ठिकाणी कीट वाटपाचा कार्यक्रम केल्याने शहरातील गरजू कुटुंबाची उपासमार होत आहे . शहराची लोकसंख्या 1, 20,095 इतकी असून दारिद्रय रेषेखालील कुटुंबे तब्बल11 हजारांच्या आसपास आहे . ज्यांची रेशन कार्डच नाहीत अशी दोन हजार मजूर कुटूंबांची चार भिंती व कोल्हाटी वस्ती, चिपळूणकर बाग, पापाभाई पत्रेवाले नगर येथे उपासमार सुरू आहे . नगरसेवकांची मागणी व भाऊसाहेब पाटील यांचे वितरण पथक यांचा ताळमेळ बसत नसल्याने चांगल्या हेतूने सुरु झालेले अन्नधान्य कीट वाटप वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे .

नगरसेविका , दीपलक्षी नाईक यांनी ही कीट मिळाले नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत . या संदर्भात सातारानामा या प्रकरणाच्या खोलात जाऊन माहिती घेतली असता बऱ्याच कीट वाटपात मिळालेले कॉल हे महसूल व जिल्हा प्रशासनाचे होते .

उपनगरातील व शहराच्या हद्दीवरच्या व मजूरांना अन्नधान्य मदतीचा ओघ गेला . तितक्या तातडीने ती मदत शहराच्या विविध वॉर्डात पोहोचली नसल्याची नगरसेवकांची विशेषतः भाजपच्या गटनेत्या सिध्दी पवार यांची तक्रार आहे . या शिधा वाटपात समन्वय व समतोल राखला जाईल . कोणतेही कुटूंब अन्नधान्य वितरणातून वंचित राहणार नाही . त्या पध्दतीने नियोजन करण्यात येत आहे अशी माहिती मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिली .

Adv