सातारा पालिकेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे यांच्यावर क्वारंटाईन कालावधीचा भंग केल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे शहराध्यक्ष जयवंत शिवदास कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे .
कांबळे यांनी हे निवेदन नगराध्यक्ष माधवी कदम व उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांना सादर केले . निवेदनात नमूद आहे की कायगुडे यांची दुबई वारी सातारा शहरात चर्चेचा विषय ठरली आहे .
क्वारंटाईन पिरियड चा भंग करून कायगुडे हे मुदतीआधीच पालीकेत हजर झाले . परदेशवारी नंतरही आपल्या पदाचा वापर करून शहरात बेजवाबदारपणे फिरत राहिले . त्यांनी सातारकरांचा जीव धोक्यात घातला . वरिष्ठ अधिकारी संचित धुमाळ यांनी थेट विचारणा करूनही कायगुडे यांनी सरळ उत्तरे न देता त्यांच्याशी वादावादी केली . कायगुडे यांना पाठीशी घालणाऱ्यांची चौकशी व्हावी . करोनाच्या संक्रमण काळात बेशिस्त वर्तन करणाऱ्या कायगुडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी कांबळे यांनी केली आहे .