भाजपा-शिवसेना महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले आणि कराड दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचाराचा झंझावात शुक्रवारी दिसून आला. पदयात्रा आणि गावभेटी मधून त्यांनी मतदारांशी संवाद साधला.
उदयनराजे भोसले आणि अतुलबाबा भोसले यांच्या प्रचार दौऱ्यास ढेबेवाडी फाटा येथून मोठ्या उत्साहात व प्रचंड गर्दीत प्रारंभ झाला.
चचेगाव, विंग, कोळेवाडी, तुळसन, येथे ग्रामदेवता निनाईदेवीचे दर्शन घेऊन हा दौरा
पुढे सवादे, ओंड, उंडाळे, काले येथे पोहोचला. यावेळी ठिकठिकाणी उदयनराजे भोसले आणि अतुल भोसले यांचे उत्साही स्वागत करण्यात आले.
काले येथे ज्येष्ठ नेते भीमरावदादा पाटील यांची भेट घेऊन चर्चा करून उदयनराजे भोसले आणि अतुल भोसले यांनी त्यांची विचारपूस केली. ग्रामस्थांशी संवाद साधला.
कालवडे, बेलवडे बुद्रुक मार्गे वाठार, रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुक, जुळेवाडी, शेणोली स्टेशन, शेरे, शेणोली, वडगाव हवेली, कार्वे, दुशेरे, कोडोली, कापील गोळेश्वर, कराड शहर, सैदापूर, गोवारे, वारूंजी, मुंढे, गोटे, विजयनगर, खोडशी, वहागाव आदी ठिकाणी उदयनराजे भोसले आणि अतुलबाबा भोसले यांनी भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला.
यावेळी दोन्ही उमेदवारांचे ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत करण्यात आले.